आनंदयात्री मित्र आणि मैत्रिणींनो,
आज ब्लॉगशी प्रयोग करताना मला एक नवीन शोध लागला. तो म्हणजे मी मराठीतूनही उत्तम टाईप करू शकतो. त्यामुळे मला तुमच्याशी आणि तुम्हाला माझ्याशी मराठीतून संवाद करायला एकदम सोपं जाणार आहे. कालच श्रीराम पेंडसे यांनी मला सुचविलं होतं की बहुसंख्य आनंदयात्री मराठी असल्याने ब्लॉग मराठीतून असावा. त्याचं म्हणणं मला पटलं होतं. पण मला मराठीतून टाईप करण्याची फारशी सवय नसल्याने कितपत जमेल याची खात्री नव्हती. पण आत्ताच कळलं की आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे मला सहज शक्य होतंय.आता बिनधास्तपणे मी तुम्हाला मराठीमधून लिहू शकतो. आणि तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया मला मराठीतून कळवत चला.
ज्या शास्त्रज्ञांनी व उद्योजकांनी ब्लॉगचं हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला अगदी सहज शक्य व उपलब्ध करून दिलं त्यांना खरोखरच शतशः धन्यवाद!
