अलकाताई गेल्या.
सकाळी अलकाताईंच्या मुलीने फोन करून सांगितलं की आई सकाळी ८ वाजता झोपेत गेली. अतिशय जड अंतःकरणाने ही बातमी ऐकली.अलकाताई आनंदयात्रेच्या कार्यक्रमांना अतिशय नियमितपणे हजर राहणाऱ्यापैकी एक. पण जवळजवळ गेले एक वर्ष आजारपणामुळे त्या क्वचितच येत असत. तरी पण अधूनमधून मला फोन करून आनंदयात्रेच्या कार्यक्रमांची माहिती करून घेत असत.
अलकाताई आनंदयात्रेच्या काही उत्साही सभासदांपैकी एक होत्या.जवळपास सर्व सभासदांशी त्यांची चांगली मैत्री होती. मला त्या कायम गंमतीने 'अध्यक्ष' म्हणून संबोधित.
आनंदयात्रेच्या कार्यक्रमातील त्यांची अनुपस्थिती अनेकांना बऱ्याच काळ जाणवत राहील.
तीन वर्षांपूर्वी आनंदयात्रा सुरु झाली. तेव्हापासून चार आनंदयात्री - ज्ञानेश्वर अगरवाल, किशन पंजाबी,प्रल्हाद बदामीकर आणि आता अलका जयवंत- आपल्याला सोडून गेले. त्यांच्या आयुष्याच्या या अखेरच्या काळात आनंदयात्रेमुळे काही आनंदाचे क्षण आले असतील. आनंदयात्रेला त्याचे समाधान आहे.
अलकाताईंच्या कुटुंबीयांच्या दुःखात आनंदयात्रा सहभागी आहे.त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.

